SEE PICS : असा होता रजनीकांत यांची कन्या सौंदर्या हिच्या लग्नाचा थाट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 15:09 IST2019-02-11T15:05:14+5:302019-02-11T15:09:47+5:30

साऊथ मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत आज ११ फेब्रुवारीला उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नबंधनात अडकली.
फिल्मी सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच या सोहळ्याला हजेरी लावली. चेन्नईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला.
लग्न मंडपातील या फोटोत सौंदर्या व विशगन यांच्यासोबत सौंदर्याचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा वेद हाही दिसला.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी, कमल हासन आदींनी या सोहळ्याला उपस्थित राहत नववधूवराचा आशीर्वाद दिलेत.
सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निमार्ती, दिग्दर्शिका आहे. सौंदर्या आणि विशगन दोघंही घटस्फोटीत आहेत.
२०१० मध्ये सौंदयार्नं चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केले होते. मात्र २०१७ मध्ये तिने घटस्फोट घेतला. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते.