सपना चौधरीने केली शूटिंगला सुरुवात; चित्रपटात सपना बनणार अभय देओलची जानू, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-09T09:39:40+5:302018-06-27T20:03:35+5:30

बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये बघावयास मिळालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच सपनाने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सपना ‘नानू की जानू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभय देओल तिच्या अपोझिट असेल. सध्या अभय आणि सपना शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.