करिनाचा पती सैफ अली खानने यामुळे वाढवली फी, आता एका सिनेमासाठी घेणार तिप्पट मानधन
By रूपाली मुधोळकर | Updated: November 11, 2020 17:54 IST2020-11-11T17:46:19+5:302020-11-11T17:54:22+5:30
सैफने नेमकी हिच संधी साधली...

बॉलिवूडचा नवाब आणि करिना कपूरचा पती सैफ अली खान लवकरच बाबा बनणार आहे. आता सैफबद्दल नवी बातमी आहे. होय, सैफूने आपल्या फीमध्ये भरभक्कम वाढ केली आहे.
एकही सिनेमा चालत नसताना सैफने फी वाढवली, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण सिनेमांमध्ये चलती नसली तरी ओटीटीवर सैफ जोरात आहे आणि याचमुळे त्याने फी वाढवली आहे.
कोरोना काळात ओटीटीला आणखी चांगले दिवस आले आहेत. सैफने नेमकी हिच संधी साधली.
‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसीरिज सैफच्या करिअरमधील गेम चेंजर सिद्ध झाली. या वेबसीरिजने सैफच्या करिअरला एक वेगळी दिशा दिली.
सैफ अली खानने किती फी वाढवली, हे अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र रिपोर्टनुसार, त्याने आपल्या फीमध्ये तिप्पट वाढ केली आहे.
रिपोर्टनुसार, आधी एका सिनेमासाठी तो 3 कोटी रूपये घ्यायचा. आता तो 11 कोटी रूपये चार्ज करतो आहे.
सैफचे अलीकडे आलेले लाल कप्तान व जवानी जानेमन हे सिनेमे फार कमाल दाखवू शकले नाहीत. पण यानंतरच्या ‘तान्हाजी’या सिनेमाने त्याने सर्व भरपाई केली. या सिनेमातील सैफची भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती.
सैफ सध्या ओटीटीवरचा लोकप्रिय स्टार आहे. प्रत्येक निर्माता त्याला कोणत्या ना कोणत्या सीरिजसाठी साईन करू इच्छितो. लवकरच सैफ अली अब्बास जफरच्या ‘दिल्ली’मध्ये लीड रोल साकारताना दिसणार आहे.
त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सैफ लवकरच भूत पुलिस आणि बंटी और बबली 2 या सिनेमात दिसणार आहे.
सध्या सैफ ‘भूत पुलिस’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.