लाडाने एकमेंकाना 'या' नावाने हाक मारतं महाराष्ट्राचं सर्वात लाडकं couple, वाचा तुम्हीही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 15:00 IST2023-12-17T14:39:58+5:302023-12-17T15:00:37+5:30
महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून रितेश आणि जिनिलीया देशमुखला सर्वत्र ओळखलं जातं.

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. एक आदर्श जो़डी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
आज रितेश 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. 17 डिसेंबर 1978 रोजी लातूर येथे रितेशचा जन्म झाला.
रितेशने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तर पहिल्याच चित्रपटात रितेशला आयुष्याचा जोडीदार म्हणून जिनिलीया मिळाली.
अनेकवर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर 2012 साली रितेश आणि जेनिलियाने लग्न केले. त्यांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत.
लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यामधील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. जिनिलीया व रितेश एकमेकांवर किती प्रेम करतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.
जिनिलीया आणि रितेश घरी एकमेंकाना अगदी गोड नावाने हाक मारतात.
जिनिलीया ही रितेशला 'ढोलू' आणि 'नवरा' या नावाने हाक मारते.
रितेशनेही तिला 'जिनी' या नावाने हाक मारतो. शिवाय तो तिला लाडाने 'बायको' अशीही हाक देतो.
रितेश आणि जिनिलीयाला रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत. जिनिलीयाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान या त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या बाळालाही जन्म देत 1 जून 2016 रोजी रितेश जेनेलिया पुन्हा आईबाबा झाले.
रितेश आणि जिनिलीया हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या भन्नाट रिल्स सर्वांचे लक्षवेधून घेत असतात.