कोरोना व्हायरसच्या भीतीने मास्क घालून शॉपिंग करताना दिसली 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:59 IST2020-03-23T15:44:43+5:302020-03-23T15:59:18+5:30

रश्मी देसाई नुकतीच मुंबईत भाजी खरेदी करताना दिसली
सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतात देखील या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत.
एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत.
चित्रीकरणाला सुट्टी असल्याने रश्मी घरातील सामान घ्यायला बाहेर पडली होती.
गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे.
रश्मीने घराच्या बाहेर पडताना मास्क घातला होता.
सार्वजनिक ठिकाणी जाताना खबरदारी म्हणून मास्क घालावे असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.