ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 17:32 IST2025-09-11T17:23:35+5:302025-09-11T17:32:19+5:30

Bhojpuri Singer Devi: भोजपुरी गायिका देवी हिने एक धाडसी पाऊल उचललं असून, तिने लग्न न करताच आई बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. एका जर्मन स्पर्म बँकेच्या मदतीने देवी ही गर्भवती राहिली होती. तिने आयव्हीएफच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला आहे. आता घरात छोटा पाहुणा आल्याने गायिका आनंदित आहे.

भोजपुरी गायिका देवी हिने एक धाडसी पाऊल उचललं असून, तिने लग्न न करताच आई बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. एका जर्मन स्पर्म बँकेच्या मदतीने देवी ही गर्भवती राहिली होती. तिने आयव्हीएफच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला आहे. आता घरात छोटा पाहुणा आल्याने गायिका आनंदित आहे.

घरात मुलाचं आगमन झाल्याने देवी आनंदित असून, तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. लग्न आणि जोडीदाराशिवाय आई बनण्याचा निर्णय घेणाऱ्या देवी हिने जीवनात याआधीही अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत.

देवी हिचा जन्म बिहारमधील छपरा जिल्ह्यात झाला होता. तिने अशी अनेक कामं केली आहेत ज्यामुळे तिचा उल्लेख बिहारचा गौरव म्हणूनही केला जातो. देवी हिला चंदा कॅसेट्सच्या बावरिया या गीतामुळे विशेष ओळख मिळाली होती.

देवी ही भोजपुरी जगतातील लोकप्रिय गायिका असून, तिचे मैथिली, मगधी, हिंदी आणि भोजपुरी भाषेतील ५० हून अधिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत.

देवी हिच्या गीतांची खास ओळख म्हणजे तिने तिच्या संगीत व्हिडीओंमध्ये नेहमीच एक सभ्यता पाळलेली आहे. देवी हिने नेहमी अश्लील गाण्यांविरोधात भूमिका घेतलेली आहे. तसेच ती अशा प्रकारच्या गीतांना कधीही प्रोत्साहन देत नाही.

मात्र ती जेव्हा माईक घेऊन मंचावर येते तेव्हा तिच्या गायनाने ती श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते.