Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:33 IST2025-05-10T16:10:18+5:302025-05-10T16:33:32+5:30

Nimrat Kaur : निमरतचे वडील मेजर भूपेंद्र सिंग यांची १९९४ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौरचा जन्म राजस्थानमधील पिलानी येथील एका शीख कुटुंबात झाला. निमरत ही दिवंगत मेजर भूपेंद्र सिंग यांची मुलगी आहे.

निमरतचे वडील मेजर भूपेंद्र सिंग यांची १९९४ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. त्यावेळी अभिनेत्री ११-१२ वर्षांची होती.

ईटाइम्सला दिलेल्या जुन्या मुलाखतीत, अभिनेत्रीने तिचे वडील भूपेंद्र सिंग यांच्याबद्दल खास माहिती शेअर केली होती.

निमरत कौर म्हणाली की, "ते एक यंग आर्मी मेजर होते, एक इंजिनियर होते जे वेरीनाग नावाच्या ठिकाणी आर्मीच्या बॉर्डर रोड्सवर तैनात होता. वडील काश्मीरला गेले तेव्हा आम्ही पटियालाला राहिलो."

"१९९४ च्या जानेवारी महिन्यात, आम्ही आमच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वडिलांना भेटण्यासाठी काश्मीरला गेलो होतो."

"दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनने कामाच्या ठिकाणाहून त्यांचं अपहरण केलं आणि सुमारे एक आठवडा त्यांना बंदी बनून ठेवलं."

"दहशतवाद्यांनी वडिलांना सोडण्याच्या बदल्यात काही दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती, जी नाकारण्यात आली. अशा परिस्थितीत वडिलांना दहशतवाद्यांनी मारलं."

"जेव्हा वडिलांचं निधन झालं तेव्हा ते फक्त ४४ वर्षांचे होते. आम्हाला माहिती मिळताच, आम्ही त्यांचं पार्थिव घेऊन दिल्लीला परतलो."

"वडिलांच्या निधनानंतर आमचं आयुष्य रातोरात बदललं. जीवनशैली बदलली असली तरी सैन्य तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहतं."

"ते तुमचं कुटुंब बनतात आणि आजही, जर तुम्हाला काही हवं असेल तर ते लगेच येतील आणि तुमच्यासाठी काहीही करतील."

"मला असंही वाटतं की ते माझ्या वडिलांच्या सद्भावनेमुळे आणि लोकांशी असलेल्या त्यांच्या नात्यामुळे आहे" असं निमरत कौरने म्हटलं आहे.