अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:11 AM2024-05-08T10:11:31+5:302024-05-08T10:31:11+5:30

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी ७ मे २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं.

कोरोनामुळे कोणतीही हौस करता आली नाही म्हणून सोनाली आणि कुणाल यांनी लग्नाच्या वाढदिवशी लंडन येथे पुन्हा लग्नगाठ बांधली.

अत्यंत पारंपरिक पध्दतीने आणि शाही थाटात हा सोहळा लंडनमध्ये पार पडला होता. या लग्नाबाबत सोनालीने खपच गोपनीयता बाळगली होती. या लग्नाचे फोटो देखील कुठे लिक होऊ दिले नव्हते.

सोनालीनं दुबईत केलेल्या लग्नाला तीन वर्ष तर पारंपारीक पद्धतीने लंडनमध्ये केलेल्या लग्नाला ७ मे २०२४ दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. यानिमित्ताने तिचा पती कुणाल बेनोडेकरने रिसेप्शनचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर एकमेकांना केक भरवताना देखील दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहतोय.

सोनालीच्या 'ती अँड ती' या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटाचा सेटवर कुटुंबीयांच्या मदतीने सोनालीची कुणालशी भेट झाली. त्यानंतर काही दिवसातच कुणालने लग्नाची मागणी घातली. त्यानंतर सोनालीने काही दिवस वाट पाहून सोनालीने कुणालला होकार दिला होता.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सोनालीनं सांगितलं होतं की, 'कुणाल लॉस अ‍ॅडजस्टर आहे. म्हणजे तो झालेला तोटा शोधतो. जे मोठ्या कंपन्यांचे मोठे मोठे तोटे होतात, ते नेमके कुठे झाले हे शोधण्याचं काम तो करतो'

सोनालीचा नवरा कुणाल हा दुबईला राहतो पण तो युकेमधून आहे.

या फोटोमध्ये कुणाला आणि सोनाली डान्स करताना दिसून येत आहेत.