Photos: जीव अडकला मोत्यात... 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 16:22 IST2024-12-22T16:10:27+5:302024-12-22T16:22:28+5:30
सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.
आता ती नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
सोनाली सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती खूप फोटो शेअर करत असते.
आता तिने एकदम खास फोटो शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
सोनालीने मिनिमल मेकअप केला. हा लूक तिनं भावाच्या रिसेप्शनसाठी केला होता.
फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "सूरत ओस दी परियां वर्गी, सीरत दी ओ मरियम लगदी, हस्ती है तां फूल झडदे ने, तुरदी है तो ग़ज़ल है लगदी….".
यावेळी सोनालीच्या मोठ्या झुमक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने यावेळी मोठे झुमके घालणे पसंत केले. तर हातामध्ये सुंदर कडे देखील तिने घातले होते.
फोटोसाठी तिनं खास पोझ दिल्या. सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अप्सरेचा हा घायाळ करणारा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.