अक्षय कुमारसोबत ऑनस्क्रीन रोमांस करुन रातोरात बनली स्टार, आता कुठे गायब आहे ही मराठमोळी अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 18:15 IST2025-05-02T18:10:27+5:302025-05-02T18:15:00+5:30
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट केले आहेत. १९९३ मध्ये आलेल्या 'सैनिक' या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सध्या काय करतेय, हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट केले आहेत. १९९३ मध्ये आलेल्या 'सैनिक' या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सध्या काय करतेय, हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
९० च्या दशकातील अनेक नायिकांनी नंतर सिनेइंडस्ट्री सोडली. पण त्या अभिनेत्रींची क्रेझ अजूनही लोकांमध्ये आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत. या अभिनेत्रीने ९० च्या दशकात अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले होते. पण अचानक ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आणि गेल्या वर्षी काही मराठी सिनेमांमध्ये पाहायला मिळाली.
आम्ही अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याबद्दल बोलत आहोत. त्याच अश्विनी भावे ज्यांनी अक्षय कुमारच्या 'सैनिक' चित्रपटात एक उत्तम भूमिका साकारली होती.
अश्विनी भावे यांचा ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समावेश होता. त्यांनी जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले. मग तो अक्षय कुमार असो किंवा ऋषी कपूर असो.
१९९३ चा 'सैनिक' चित्रपट अश्विनी भावेंसाठी खूप खास होता. या चित्रपटात त्यांना खूप पसंती मिळाली होती. अश्विनी यांच्या त्या भूमिकेचे लोक अजूनही चाहते आहेत.
अश्विनी यांनी ऋषी कपूरसोबत 'हिना' हा चित्रपटही केला होता. हिना, बंधन आणि सैनिक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून अश्विनी रातोरात स्टार बनल्या. पण, नंतर त्यांनी अचानक इंडस्ट्रीला अलविदा म्हटले.
अश्विनी भावे यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे २० चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी काही हिट ठरले तर काहींना फारसे काही विशेष यश मिळाले नाही. त्यांचा पहिला चित्रपट 'हिना' होता, जो १९९१ मध्ये प्रदर्शित झाला.
नंतर अश्विनी यांनी किशोर बोपर्डीकरशी लग्न केले. लग्नानंतर त्यांनी स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले आणि परदेशात स्थलांतरित झाली.
गेल्या वर्षी अश्विनी भावे घरत गणपती आणि गुलाबी या सिनेमात पाहायला मिळाल्या.