वय ३९ वर्ष अन् प्रिया बापटचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, काय आहे तिचं फिटनेस रुटीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:50 IST2026-01-06T18:41:27+5:302026-01-06T18:50:19+5:30

प्रिया आणि उमेश कामत हे रील आणि रिअल लाईफमधील सर्वात लाडके कपल आहेत. प्रियाचा फिटनेस आणि तिचा उत्साह पाहून तिचे चाहते कौतुक करत आहेत.

मराठी रंगभूमीपासून ते हिंदी वेब विश्वापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.

विशेष म्हणजे, प्रियाने वयाची ३९ वर्षे पूर्ण केली असली, तरी ती आजही विशीतल्या तरुणीसारखी फिट आणि तितकीच सुंदर दिसते.

नव्या वर्षाची सुरुवात होताच प्रिया बापटचा फिटनेस अवतार चर्चेत आला आहे. प्रियानं सोशल मीडियावर शेअर केलेले जीममधील नवे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

प्रियाचा जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉरमेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

प्रियानं पती उमेशसोबतचेही फोटोही शेअर केले आहेत. प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी केवळ अभिनयातच नाही, तर फिटनेसच्या बाबतीतही एकमेकांना उत्तम साथ देते.

प्रिया आणि उमेश दोघेही फिटनेस फ्रीक आहेत. आता उमेशसोबतचे तिचे हे वर्कआऊट फोटो चाहत्यांसाठी 'कपल गोल्स' ठरत आहेत.

प्रिया-उमेशच्या फोटोशूटवर सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकर यानं हे फोटोशूट केलं आहे.

प्रियाचे फोटो पाहून चाहत्यांना तिच्या फिटनेस रुटीनबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली आहे. तर काही दिवसांपुर्वी न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रिया साध्या पण प्रभावी जीवनशैलीबद्दल खुलासा केला होता.

प्रियाच्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम, पोषक आहार आणि भरपूर पाणी पिणे. प्रियानं सांगितलं होतं की, वरण भात, उसळ, कोशिंबीर, भाकरी हे आहारात असेल तर ती जास्त सुखी असते. प्रियाला वडापाव, फ्रँकी, बर्गर, पिझ्झा हे जास्त आवडत नाहीत.

प्रिया म्हणालेली, "मला गोड खूप वाटतं. पण तेही मी प्रमाणातच खाते. फळं भरपूर खाते आणि मला ते खरंच आवडतात. या सगळ्यासाठी मला कोणीही जबरदस्ती करत नाही किंवा हे असंच केलं पाहिजे म्हणून मी हे करत नाही. तर हे मला खरंच आवडतं. खूप वर्षात हेच माझ्या जीवनशैलीचा भाग झालं आहे". विशेष म्हणजे प्रिया रात्री साडेसातच्या आत जेवते.