'माझे तुझे नाते जणू...' नाकात मोत्याची नथ, गळ्यात तन्मणी हार, स्पृहाचा नवा व्हिडिओ Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 04:44 PM2024-06-19T16:44:55+5:302024-06-19T16:56:51+5:30

मराठी मनोरंजन विश्वातील एक गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीकडे पाहिलं जातं.

अभिनेत्री स्पृहा जोशी उत्तम गायन, लेखन आणि सुत्रसंचालन देखील करते. त्यामुळे कलाविश्वात आणि सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.

चित्रपट, नाटक व मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने रसिकांना भुरळ पाडली आहे.

'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

याबरोबरच छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता शेअर करत असते.

नुकताच स्पृहाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

लाल रंगाची साडी त्यावर मराठमोळा साज करत अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय.