कमनीय बांधा म्हणजे सौंदर्य नव्हे! 'या' मराठी अभिनेत्रींनी मोडीत काढला साईज झिरोचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:07 PM2022-03-08T15:07:51+5:302022-03-08T15:13:00+5:30

Marathi actresses: गेल्या काही काळात सौंदर्याची संकल्पना हळूहळू बदलत चालल्याचं दिसून येत आहे.

गेल्या काही काळात सौंदर्याची संकल्पना हळूहळू बदलत चालल्याचं दिसून येत आहे. सुंदर चेहरा, गोरा रंग, कमनीय बांधा ही सौंदर्याची व्याख्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयामुळे मोडली आहे. सौंदर्य म्हणजे केवळ दिसणं नव्हे. तर त्या कलाकाराच्या अंगी असलेले गुण महत्त्वाचे हे काही अभिनेत्रीने जगाला दाखवून दिलं. त्यामुळेच साईज झिरोचा ट्रेंड मोडीत काढणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.

स्नेहल शिदम - चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून स्नेहलने कलाविश्वात एन्ट्री केली आणि आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

आरती सोलंकी - आरती सोलंकी हे नाव कोणालाही नवीन नाही. बिग बॉस मराठीमुळे प्रकाशझोतात आलेली आरती तिच्या संवादफेक कौशल्यामुळे विशेष लोकप्रिय आहे.

अन्विता फलटणकर - येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत अन्विता झळकली आहे. या मालिकेत स्वीटू ही भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

वनिता खरात - मराठी कलाविश्वातील अनेक रिअॅलिटी शो, नाटकांमध्ये झळकलेली वनिता खरात बॉलिवूडमध्येही झळकली आहे. कबीर सिंग या चित्रपटात तिने काम केलं असून तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटात तिने पुष्पा ही भूमिका साकारली होती.

अक्षया नाईक - 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेच्या माध्यमातून स्त्रीचं खरं सौंदर्य काय असतं हे सांगायचा प्रयत्न केला आहे. केवळ बारीक असणं आणि ग्लॅमरस दिसणं म्हणजे सौंदर्य नाही. तर मनाचं सौंदर्य हाच खरा दागिना हे या मालिकेतून दाखवलं आहे.

निर्मिती सावंत - उत्तम अभिनयकौशल्य आणि संवादफेक शैली यांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत. कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं.

विशाखा सुभेदार - महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडी एक्स्प्रेस अशा कितीतरी रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विशाखाने कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे. आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.