बॉलिवूडची हवा लागली! डीपनेक गाऊनमध्ये आर्ची झाली बोल्ड; पण सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 02:11 PM2024-04-19T14:11:40+5:302024-04-19T14:25:08+5:30

रिंकू राजगुरुचा कधीही न पाहिलेला असा लूक, सोशल मीडियावर नेटकऱ्यांना मात्र ट्रोल करण्याचीच मिळाली संधी

सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुने (Rinku Rajguru) अगदी कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2016 साली आलेल्या 'सैराट' सिनेमावेळी ती फक्त १० वीत होती. वयाच्या १५ व्या वर्षीच ती या सिनेमामुळे रातोरात स्टार झाली होती.

रिंकूने यानंतर काही मोजकेच पण दमदार सिनेमे केले. 'कागर', 'झुंड', 'मेकअप','आठवा रंग प्रेमाचा' अशा काही सिनेमांमध्ये ती दिसली. तसंच काही वेबसीरिजमध्येही झळकली.

सैराट येऊन आता ८ वर्ष झाली आहेत तरी रिंकूची क्रेझ काही कमी झालेली नाही. तिला आजही लोक 'आर्ची'अशीच हाक मारतात. तिचे साडीतील फोटो तर चाहत्यांना घायाळ करतात.

रिंकूला प्रेक्षकांनी कायम सोज्वळ लूकमध्ये किंवा साध्या लूकमध्येच पाहिलं आहे. मात्र जेव्हा एखादी मराठी अभिनेत्री बोल्ड लूकमध्ये दिसते तेव्हा लोकांच्या पोटात दुखतं. रिंकूसोबतही तेच झालं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रिंकूने हजेरी लावली. रेड कार्पेटवर येताच तिचा बोल्ड लूक पाहून सगळेच अवाक झाले.

डीपनेक कलरफुल गाऊन, गळ्यात सुंदर चमचमचा हार, सिल्व्हर रंगाचे कानातले, शॉर्ट हेअरकट आणि ग्लॅमरस मेकअप अशा लूकमध्ये ती सर्वांसमोर आली.

आर्चीचा हा लूक बऱ्याच जणांना आवडला. पण यावर ट्रोलर्स संधी कशी सोडणार. 'बॉलिवूडवाला copy करतात आपण काय करतोय याचं भान नाही','हिने पण अंगप्रदर्शन करायला सुरुवात केली' अशा अनेक कमेंट करत तिला ट्रोल करण्यात आलंय.

रिंकूचा हा लूक काही नेटकऱ्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही. अद्याप रिंकूने ट्रोलर्सला यावर उत्तर दिलेलं नाही. मात्र काही जणांनी तिची बाजू घेत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

रिंकूने तिचा आवडता अभिनेमा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतही फोटो शेअर केला आहे. 'फेवरेट' असं कॅप्शन तिने दिलं आहे. नवाजुद्दीनला भेटल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय.