SEE PICS: आम्ही दिसतोच लय भारी, साडीमध्ये रिंकुची झलकच न्यारी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:00 IST2020-08-26T06:00:00+5:302020-08-26T06:00:00+5:30
'सैराट' सिनेमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगूरूच प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो. नुकताच साडीमधला नवीन फोटो शेअर करत तिने चाहत्यांची वाहवा मिळवली आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.

शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.

तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

साडी परिधान केलेले वेगवेगळे फोटो रसिकांना नेहमीच भावतात.

या साडीत रिंकूचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.

'सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं.

रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली.

महाराष्ट्राच काय तर सारा देश आर्चीच्या प्रेमात पडला.

















