ब्लॅक ड्रेसमध्ये पूजा सावंतने केला कहर! अभिनेत्रीचा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:42 IST2024-08-21T15:39:17+5:302024-08-21T15:42:27+5:30
Pooja Sawant : पूजा सावंतचा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज! अभिनेत्रीचे हॉट फोटो एकदा पाहाच

पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून पूजाने तिची ओळख निर्माण केली.
पूजा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. पूजा तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
कलरफूल पूजाने नुकतंच ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळतोय.
पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. केस मोकळे सोडत तिने ग्लॅमरस लूक केला आहे.
फोटोसाठी पूजाने खास पोझही दिल्या आहेत. हाय हिल्स घालत अभिनेत्रीने तिचा जलवा दाखवला आहे.
पूजाचे हे खास फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काही महिन्यांपूर्वीच पूजा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सिद्धेशबरोबर लग्नगाठ बांधत तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.