अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आहे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:23 IST2025-03-29T18:02:31+5:302025-03-29T18:23:53+5:30

अजय देवगणसोबत दिसणारी 'ही' बालकलाकार आज आहे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नायिका, कोण आहे ती?

२००५ साली अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'मैं ऐसा ही हॅूं' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात ही बालकलाकार अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ही बालकलाकार म्हणजेच मराठी अभिनेत्री ऋचा वैद्य.

ऋचा वैद्यने अगदी बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.

अलिकडेच अभिनेत्री ऋचा वैद्य आदिनाथ कोठारे दिग्दर्शित 'पाणी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली.

या चित्रपटातून ऋचा वैद्यने मराठी चित्रपटविश्वात पदार्पण केलं.

महाराष्ट्रातील सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'पाणी' चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झालं.

लवकरच ही अभिनेत्री ललित प्रभाकर सोबत 'प्रेमाची गोष्ट-२' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.