मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे! अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा दाक्षिणात्य लूक, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:25 IST2025-02-22T17:17:19+5:302025-02-22T17:25:03+5:30
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा दाक्षिणात्य लूक, पाहा फोटो.

भाग्यश्री मोटे ही मराठी कलाविश्वातील नावाजलेली नायिका आहे.
अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे. याशिवाय दाक्षिणात्य सिनेमांमध्येही तिने काम केलंय.
निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या भाग्यश्री मोटे दाक्षिणात्य लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
या फोटोंमध्ये हिरव्या रंगाची साडी, केसांची वेणी घालून त्यावर तिने गजरा माळला आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
"मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे!" असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या या फोटोंना दिलं आहे.
भाग्यश्री मोटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिने 'देवो के देव महादेव', 'सिया के राम','देवयानी' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.