सोशल मीडियामुळे प्रथमेशला मिळाली लाइफ पार्टनर; फूल टू फिल्मी आहे दगडू-प्राजूची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 04:05 PM2024-01-02T16:05:41+5:302024-01-02T16:19:32+5:30

Prathamesh parab: प्रथमेश लवकरच क्षितीजा घोसाळकर सोबत लग्नगाठ बांधणार आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. 'टाईमपास' या सिनेमाच्या माध्यमातून प्रथमेश घराघरात पोहोचला.

प्रथमेशने आजवर अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते.

अलिकडेच प्रथमेशने सोशल मीडियावर त्याच्या केळवणाचे फोटो पोस्ट केले आणि चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.

१४ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रथमेश त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या जोडीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोचं नाव क्षितीजा घोसाळकर असं असून या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्यास चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

कंटेन्ट रायटर असलेल्या क्षितीजा आणि प्रथमेश यांची पहिली ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली.

प्रथमेश सोशल मीडियावर कन्टेन्ट रायटर क्षितिजा घोसाळकरशी लग्न करणार आहे. प्रथमेश परबने लग्नाची तारीख सांगितली नसली तरी तो 14 फेब्रुवारी 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.

'क्षितिजा आणि माझं लव्हमॅरेज आहे. इंस्टाग्रामवर आम्ही आधी भेटलो. गप्पा मारताना आमची छान मैत्री झाली,' असं प्रथमेश म्हणाला.

पुढे तो म्हणतो, 'टाईमपास 3'च्या शूटिंगदरम्यान आम्ही ठाण्यात पहिल्यांदा भेटलो. पुढे आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.'