Hruta Durgule : करिअर यशाच्या शिखरावर असताना हृता दुर्गुळेनं केलं अचानक लग्न, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:31 PM2023-04-14T12:31:08+5:302023-04-14T12:42:40+5:30

Hruta Durgule : २०२२ मध्ये हृताने प्रतीक शाहसोबत लग्न केले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण लग्नाचा निर्णय का घेतला याबद्दल तिने सांगितले.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. ती 'दुर्वा' आणि 'फुलपाखरू' या मालिकेतून घराघरात पोहचली.

हृता दुर्गुळेच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. मालिकेनंतर तिने मराठी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 'दादा एक गुड न्यूज आहे' सारखे नाटक केल्यानंतर ती 'अनन्या', 'टाइमपास ३', सर्किट' सारख्या चित्रपटात झळकली. मात्र करिअरच्या या शिखरावर असताना हृताने लग्नाचा निर्णय घेतला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

२०२२ मध्ये हृताने प्रतीक शाहसोबत लग्न केले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण लग्नाचा निर्णय का घेतला याबद्दल तिने सांगितले.

सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात बोलताना हृता म्हणाली, 'मी आणि प्रतीक भेटलो तेच कामानिमित्त बोलायला. मला ठाऊक नव्हतं की तो दिग्दर्शक आहे. नंतर आमचं बोलणं वाढलं आणि त्याने मला थेट लग्नासाठी विचारले.मी म्हणाले तू आई बाबांशी बोल. त्यानंतर मी त्याच्या घरी गेले. सगळं जुळलं पण मला जास्त काय आवडलं असेल तर हे की खूप कमी लोकं आता जबाबदारी घ्यायला तयार आहेत. किंवा इतके विचार स्पष्ट आहेत त्यांचे की मला हेच हवंय.

पुढे हृता म्हणाली, 'मी जर तुला जे सांगतोय तर ते मी आयुष्यभर निभावेन. माझ्यासाठी प्रेम खूप नंतर येते पण शब्द पाळणे पहिले येते. मला प्रतीकच्या बाबतीत कशाबद्दलच भीती वाटली नाही. मला कधीच असे वाटले नाही की हे नाते टिकले नाही तर? अरे जर यामुळे माझे करिअर थांबले तर? मला कधीच नाही वाटले. मी माझे निर्णय असे पटकन घेते. मला प्रतीकच्या बाबतीत कुठलाच दुसरा विचार आला नाही. नकारात्मक काहीच वाटलं नाही. मला जे पहिल्यांदा वाटलं तेच केले मी.

पुढे हृता म्हणाली, 'ना माझ्या करिअरच्या बाबतीत की याचे परिणाम काय होतील, ना माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत. मला असं वाटलं की काम तर होतंच राहील. मी काम करत राहणारच आहे. लग्न हा ब्रेक असू शकत नाही.

मला खूप लोकांनी विचारलं पण की काय तू लवकर लग्न करतेय. मला असं वाटलं की मी खुश आहे कारण मला जेव्हा करायचं होतं तेव्हा मी केलं. माझी आई कधीपासून सांगत होती आपण आता मुलं बघूया तुझं काही असेल तर तू सांग. घरी काही नियम वगरे नव्हते. मी म्हणाले की जेव्हा मला वाटेल तेव्हाच करेन, असे हृता म्हणाली.

आणि जेव्हा तुम्हाला योग्य व्यक्ती भेटते तेव्हा का नाही? मला जसं वाटत होतं तसंच माझं लग्न झालं. मला वाटत होतं की माझ्या लग्नाला खुप कमी लोकांनी हजर असावं. जवळच्या व्यक्तींनीच या लग्नाला हजर असावं, असे हृता म्हणाली.

तिने पुढे सांगितले की, अगदी सांगायचं तर लग्नाच्या दोन दिवस आधीपर्यंत मी प्रयोग करत होते. १८ ला लग्न होतं आणि मी १५- १६ पर्यंत दुबईत प्रयोग करत होते. त्यामुळे आईपण मला ओरडत होती की अगं नवऱ्या मुलीने लग्नाच्या आधी घराबाहेर पडायचं नसतं आणि तू थेट परदेशातच गेली आहेस. पण आमचं असं काही नव्हतं थाटामाटात वगरे. मेहंदी, संगीत वगरे काही नव्हतं. आम्ही चला लग्न झालं आता आम्हाला फिरायला जायचंय. प्रतीकने पण खूप पाठिंबा दिला मला यात. तो पण तोपर्यंत शूट करत होता.

झीचे तर मी मनापासून आभार मानेन की तेव्हा मन उडू उडू सुरू होतं आणि हिरोईनला १५ दिवस सोडलं त्यांनी.शेवटी नातं आपण टिकवतो असं वाटतं मला. आपण महत्वाचे असतो त्यात. त्याच्या घरातल्यांनीही खूप समजून घेतलं.

हृताचा 'सर्किट' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.