'नॅशनल क्रश' गिरीजा ओक पाँडिचेरीमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:19 IST2025-11-23T17:04:22+5:302025-11-23T17:19:27+5:30
पाँडिचेरीच्या किनाऱ्यावर गिरीजा ओकचा खास अंदाज; चाहते झाले फिदा!

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री गिरीजा ओक व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा ब्रेक घेत गिरीजा सध्या पाँडिचेरीच्या सुंदर आणि शांत समुद्रकिनारी वेळ घालवत आहे.

काळ्या-पांढऱ्या रंगाचा फ्लोरल ड्रेसमध्ये गिरीजा अत्यंद सुंदर दिसतेय. नैसर्गिक वातावरणात तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.

गिरिजाने या सुंदर फोटोंना "Pondy" असं कॅप्शन दिलं. तिचे व्हॅकेशनचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

गिरिजाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या साधेपणाचे आणि सौंदर्याचे चाहते कमेंट बॉक्समध्ये भरभरुन कौतुक करत आहेत.

गिरीजा ओकने पाँडिचेरीच्या समुद्रकिनाऱ्याचा एक फोटो शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

अगदी नो-मेकअपमध्ये गिरीजाने स्वतःचा सहज आणि सोज्वळ लूक दाखवला आहे.

गिरीजा ही 'नॅशनल क्रश','व्हायरल गर्ल' म्हणून ओळखली जात आहे. 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीतील तिचा लूक व्हायरल झाला.

या मुलाखतीतला तिचा साधा, सोज्वळ लुक नेटकऱ्यांना इतका आवडला की, नेटकऱ्यांनी तिला भारताची नवी क्रश म्हणूनच घोषित केलं.

अशातच आता अभिनेत्री नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित 'परफेक्ट फॅमिली ' वेब सीरिजचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून या सिनेमामध्ये प्रेक्षकांना एका मजेदार, गुंतागुंतीच्या पंजाबी कुटुंबाची झलक पाहायला मिळते.

















