Father’s Day 2022: बाबा...!! मराठी अभिनेत्रींनी शेअर केलेत बाबासोबतचे खास फोटो, तुम्ही पाहिलेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 05:45 PM2022-06-19T17:45:10+5:302022-06-19T17:50:25+5:30

Father’s Day 2022: आज फादर्स डे... सगळेच आपल्या लाडक्या बाबाला या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या बाबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फादर्स डे निमित्त पोस्ट शेअर केली आहे. बाबानं खूप प्रेम, आधार आणि स्थैर्य दिलं..., असं तिने म्हटलं आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं बाबासोबतचा एक गोड फोटो शेअर करत, हॅपी फादर्स डे, असं लिहिलं आहे.

अमृता खानविलकर हिनेही बाबाचा फोटो शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अपूर्वा नेमळेकर हिनं बालपणीचा बाबासोबतचा फोटो शेअर केला आहे. मी तुमच्यासाठी कायम अशीच लहान मुलगी म्हणून राहणार. बाबा तुमची खूप आठवण येते,असं अपूर्वाने लिहिलं आहे.

अभिनेत्री रूपाली भोसले हिने देखील वाडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या आयुष्यात प्रकाशवाट निर्माण करणारा बाबा असतो...असं तिने म्हटलं आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने बाबासोबतचा एक हसरा फोटो शेअर केला आहे. बाबानं नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझी स्वप्न पूर्ण करण्यात मला मदत केली..., असं तिने म्हटलं आहे.

भार्गवी चिरमुले हिने आपल्या रियल आणि रील आयुष्यातील वडिलांचे फोटो शेअर करत दोघांचेही आभार मानले आहे. माझ्यातील आत्मविश्वास तुम्ही जागा केला असं तिने म्हटलं आहे.