'अग्गंबाई अरेच्चा'मधील ही साधी सोज्वळ अभिनेत्री आठवतेय का?, सध्या आहे कलाविश्वातून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 06:00 AM2023-04-30T06:00:00+5:302023-04-30T06:00:00+5:30

'अग्गंबाई अरेच्चा' चित्रपटातून या अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

संजय नार्वेकरचा 'अग्गंबाई अरेच्चा' चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरहिट चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटात महिलांच्या मनात काय सुरुये या गोष्टी संजय नार्वेकरला (Sanjay Narvekar) कळत असतात. मात्र यामुळे त्याची होणारी घालमेल या चित्रपटात मांडण्यात आली होती. श्रीरंग देशमुख नावाची भूमिका संजय नार्वेकरने साकारली होती.

संजय नार्वेकरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका अभिनेत्री प्रियंका यादवने निभावली होती.

या चित्रपटात प्रियंका यादवची भूमिकाही लक्षवेधी ठरली होती.

या चित्रपटात प्रियंकाने आपल्या भूमिकेने कमालीची छाप पाडली होती.

ऑनस्क्रीन साधी सोज्वळ दिसणारी प्रियंका यादव खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस दिसते.

प्रियंकाचा ग्लॅमरस अंदाज पाहून तिला ओळखणंही कठीण झाले आहे. इतकी ती वेगळी दिसते.

ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते.

अग्गंबाई अरेच्चा चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

'अग्गंबाई अरेच्चा' या चित्रपटानंतर आणखी काही चित्रपटातही ती झळकली होती.

मात्र सध्या ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे.

ती सध्या कुठेय आणि काय करतेय हे कळू शकलेलं नाही.