'नाकावरच्या रागाला औषध काय...' गाण्यातील ही छकुली आठवतेय का? तब्बल ३४ वर्षानंतर आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 06:00 IST2023-05-23T06:00:00+5:302023-05-23T06:00:02+5:30
Kalat Naklat Movie : 'कळत नकळत' चित्रपटात झळकलेली ही चिमुरडी आता दिसते खूपच सुंदर, अभिनयाऐवजी करतेय हे काम

कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यासारखे दिग्गज कलाकार लाभले होते.
या चित्रपटासोबतच त्यातील हे एक रेशमी घरटे.. आणि नाकावरच्या रागाला औषध काय… ही गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यात हे दोन बालकलाकार देखील झळकलेले पाहायला मिळाले. ते म्हणजे ओमेय आंब्रे आणि मृण्मयी चांदोरकर.
छकुली अर्थात मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे.
व. पू. काळे यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे. एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यातील ही वाट एकटीची, ठिकरी, साथी अशी पुस्तके खूपच प्रसिद्धी मिळवून गेली.
त्यांची मुलगी “स्वाती चांदोरकर” या देखील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
मृण्मयी चांदोरकर ही स्वाती चांदोरकर यांचीच मुलगी. एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते.
मात्र पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही.
मृण्मयीचेही लग्न झाले असून ती आपल्या घर संसारात रमली आहे.
याशिवाय स्टार इंडियाशी ती निगडित आहे.