'दे धक्का'मध्ये सायलीची भूमिका करणारी गौरी वैद्य आहे कलाविश्वातून गायब, आता दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:10 PM2024-04-22T13:10:35+5:302024-04-22T13:20:38+5:30

Gauri Vaidya : गौरी वैद्य हिने दे धक्का चित्रपटात सायलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा सायलीच्या डान्स स्पर्धेवर आधारीत होती. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत झालेले गाणे उगवली शुक्राची चांदणी हिट ठरले होते.

२००८ साली 'दे धक्का' (De Dhakka Movie) चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यातील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले. सिद्धार्थ जाधवचा अतरंगी अंदाज आणि मकरंद अनासपुरेचा गावरान बाज प्रेक्षकांना खूपच भावला. तसेच शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्याही या सिनेमात भूमिका होत्या.

'दे धक्का' या चित्रपटातील दोन बालकलाकरांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. हे बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी (Saksham Kulkarni) आणि गौरी वैद्य (Gauri Vaidya) . आता हे चिमुरडे चांगलेच मोठे झालेत आणि त्यामुळे त्यांचा लूकही.

गौरी वैद्य हिने दे धक्का चित्रपटात सायलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा सायलीच्या डान्स स्पर्धेवर आधारीत होती. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत झालेले गाणे उगवली शुक्राची चांदणी हिट ठरले होते.

चित्रपटातील याच गाण्यामुळे गौरीला नवी ओळख आणि खूप लोकप्रियता मिळाली. बऱ्याच मोठ्या कालावधीपासून गौरी कलाविश्वापासून दुरावली आहे. आता तिला पाहून तुम्ही ओळखणारही नाही.

नुकतेच गौरीचे सोशल मीडियावर नवीन फोटो पाहायला मिळाले. त्यात ती खूपच बदललेली दिसत आहे.

गौरीने मुंबईत माटुंगा इथल्या ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतली आहे.

‘दे धक्का’ चित्रपटानंतर गौरी वैद्य हिने ‘शिक्षणाचा आयचो घो’ या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. तसेच २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ या रिअॅलिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत सहभाग घेतला होता.

२०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यात तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

या चित्रपटानंतर ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसली नाही.