नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरच्या नवऱ्याला कधी पाहिलंय? आहेत प्रसिद्ध बिझनेसमॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 01:07 PM2022-03-08T13:07:14+5:302022-03-08T13:12:16+5:30

Phulwa khamkar: फुलवा खामकर अनेकदा तिच्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेऊयात.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फुलवा खामकर.

फुलवाने आतापर्यंत तिच्या तालावर अनेक दिग्गज कलाकारांना नाचवलं आहे. थोडक्यात, तिने अनेक कलाकारांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे.

कलाविश्वाप्रमाणेच फुलवा सोशल मीडियावरही सक्रीय आहे.

फुलवा तिच्या डान्सचे वा कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असते.

फुलवा खामकर अनेकदा तिच्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेऊयात.

फुलवाचं लव्ह मॅरेज आहे. कॉलेजमध्ये असताना तिची आणि तिच्या नवऱ्याची पहिली भेट झाली.

फुलवाच्या नवऱ्याचं नाव अमर खामकर आहे. फुलवा आणि अमर दोघंही कॉलेजच्या हायकर क्लबचे सदस्य होते. यावेळी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर.

अमर खामकर यांचा स्वत:चा बिझनेस असल्याचं सांगण्यात येतं.

अमर खामकर यांचा मसाल्यांचा व्यावसाय आहे. लालबागमध्ये त्यांच्या मसाल्याच्या दुकानांच्या शाखा असल्याचं सांगण्यात येतं.