लक्ष्याच्या लेकीने पारंपरिक अन् मॉडर्न अंदाजात लुटली लाइमलाइट, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

By देवेंद्र जाधव | Updated: June 18, 2025 17:38 IST2025-06-18T17:11:26+5:302025-06-18T17:38:18+5:30

लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वानंदीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री आहे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डेंची लेक स्वानंदीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

स्वानंदीने पारंपरिक आणि मॉडर्न अंदाजात सोशल मीडियावर फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे. या फोटोत स्वानंदी पूलमध्ये दिसतेय.

स्वानंदी पारंपरिक अंदाजातही खूप सुंदर दिसते. स्वानंदीने गुलाबी रंगाची साडी परिधान करुन सोशल मीडियावर खास फोटोशूट केलं आहे.

स्वानंदीचं सौंदर्य मॉडर्न आणि पारंपरिक अंदाजात चांगलंच खुलुन आलंय. स्वानंदीने या फोटोत केसात फुल माळल्याने तिचं सौंदर्य बहरलं आहे.

स्वानंदीने सुद्धा आई प्रिया बेर्डे, बाबा लक्ष्मीकांत बेर्डे आणि भाऊ अभिनय बेर्डेच्या पावलावर पाऊल टाकून मनोरंजन विश्वातील काही सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

स्वानंदी बेर्डेने मन येड्यागत झालं, रिस्पेक्ट अशा सिनेमांमध्ये अभिनय केलाय. स्वानंदीच्या दोन्ही सिनेमांना प्रेक्षक आणि समीक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं.

स्वानंदी बेर्डे सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करत नसली तरीही तिच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा असते. याशिवाय ती चाहत्यांच्याही संपर्कात असते.