मिस्टर अॅण्ड मिसेस चांदेकर! पाहा, सिद्धार्थ व मितालीचा वेडिंग अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 11:23 IST2021-01-25T11:07:05+5:302021-01-25T11:23:17+5:30
केळवण,मेहंदी, हळद ते लग्न...एकापेक्षा एक सुंदर फोटो

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर यांनी काल 24 जानेवारीला लग्नाच्या आणाभाका घेतल्या. पुण्यात अतिशय मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.
या सुंदर सोहळ्याचे तितकेच सुंदर फोटो मिताली व सिद्धार्थने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.
लग्नात एका क्षणी सिद्धार्थ व मिताली एकमेकांच्या डोळ्यांत असे हरवले.
ही माझी आणि माझीच... असे म्हणत सिद्धार्थ हा गोड फोटो शेअर केला.
एक चुटकी सिंदूर... असे कॅप्शन देत सिद्धार्थने हा सुंदर फोटो शेअर केला आहे.
सिद्धार्थने मितालीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले तो क्षण...
लग्नमंडपात मराठमोळी मितालीची ही अदा...
मितालीचा हा सुंदर फोटो पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल.
हळद लागली आणि सिद्धार्थच्या गालाचे चुंबन घेण्याचा मोह मितालीला आवरता आला नाही.
मेहंदीचा हा फोटोही सुंदर आहेत.
सिद्धार्थ नावाची मेहंदी हातावर मिरवताना मिताली.
मितालीने अशी सुंदर पोज दिली.
ही मिताली व सिद्धार्थच्या लग्नातील छोटू करवली.
लग्नाआधी मराठी सेलिब्रिटींनी सिद्धार्थ व मितालीचे केळवण केले.
केळवणाचे फोटोही दोघांनी शेअर केले होते.