Kareena Kapoor पासून Janhvi Kapoor पर्यंत, २०२१मध्ये व्हॅकेशनसाठी गेलेल्या सेलिब्रेटींचे फोटो झाले होते व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 09:11 PM2021-12-18T21:11:00+5:302021-12-18T21:28:46+5:30

Celebs Vacation in 2021: गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष बॉलिवूड स्टार्ससाठी काहीसे दिलासा देणारे ठरले. यावर्षी अनेक स्टार्स व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

Celebs Vacation in 2021: गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष बॉलिवूड स्टार्ससाठी काहीसे दिलासा देणारे ठरले. यावर्षी अनेक स्टार्स व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले आणि त्यांचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. यामध्ये करीना कपूर (Kareena kapoor), शाहिद कपूर (Shahid Kapoor), आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) आणि जान्हवी कपूर (Jahnvi Kapoor) यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरही या उन्हाळ्यात तिच्या गर्ल गँगसोबत मालदीवला गेली होती. मालदीवमधील जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

आयुषमान खुराना या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नी ताहिरासोबत मालदीवला गेला होता. फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की त्यांनी सुट्टीचा किती आनंद लुटला असेल.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूतही सुट्टीवर मालदीवला गेले होते. या ट्रिपचे एकापेक्षा जास्त फोटो मीरा आणि शाहिदने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते जे खूप व्हायरल झाले होते.

अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कुटुंबासह मालदीवला गेली होती. या व्हॅकेशन्सचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. याआधीही सैफच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने व्हेकेशनसाठी मालदीवची निवड केली होती.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलिया भटही तिच्या गर्ल गँगसोबत मालदीवला गेली होती. आलियाने मालदीवमध्ये किती एन्जॉय केले असेल, याचा अंदाज फोटो पाहून तुम्ही लावू शकता.