कंगना राणौतने मेरिल स्ट्रीपसोबत केली स्वत:ची तुलना, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 15:02 IST2021-02-10T14:38:22+5:302021-02-10T15:02:59+5:30
कंगना राणौतने काल हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीपसोबत स्वत:ची तुलना केली होती. आपल्या ट्वीटमध्ये तिने मेरिलच्या नावाचा उल्लेख केला होता.

कंगना राणौतने काल हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीपसोबत स्वत:ची तुलना केली होती. आपल्या ट्वीटमध्ये तिने मेरिलच्या नावाचा उल्लेख केला होता. आता कंगनाने उल्लेख केलेली ही मेरिल स्ट्रिप आहे तरी कोण हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मेरिल स्ट्रिप हॉलिवूडची एक दिग्गज अभिनेत्री आहे. मेरिलला एकदा-दोनदा नाही तर 21 वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळालेले आहे.
तीन वेळा तिला ऑस्करने गौरविण्यात आले आहे. 1980 साली ‘क्रेमर वर्सेज क्रेमर’ या चित्रपटासाठी तिला ऑस्करने गौरविण्यात आले होते.
1983 मध्ये ‘सोफीज च्वॉईस’साठी तिने दुसरा ऑस्कर जिंकला होता.
2012 साली ‘द आयर्न लेडी’ साठी तिला तिस-यांदा ऑस्कर मिळाला.
गोल्डन ग्लोब अवार्डसाठीही तिला 32 वेळा नामांकन मिळाले आणि 9 वेळा तिने या पुरस्कारावर नाव कोरले.
1977 साली ज्युलिया या सिनेमातून मेरिलने डेब्ये केला होता. 1978 साली प्राईमटाईम अॅमी अवार्डने तिला गौरविण्यात आले होते. यानंतर द डिअर हंटरसाठी तिला ऑस्कर नामांकन मिळाले होते.
मेरिलने आऊट आॅफ आफ्रिका, डेथ बिकम्स हर, द ब्रिजेज ऑफ मैडिसन काऊंटी, मामा मिया, जुली अॅण्ड ज्युलिया, इट्स कॉम्प्लिकेटेड, इंटू द वुड्स अशा अनेक हॉलिवूडपटात काम केले.