'हे बेबी'ची लिटिल एंजेल आता झाली 'ब्युटीफुल गर्ल'; फोटो पाहून चाहते म्हणाले - 'हा तर सुपरमॉडेलचा लूक!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:11 IST2025-11-04T17:48:25+5:302025-11-04T18:11:55+5:30
Hey Baby Movie : अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान अभिनीत २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हे बेबी' चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. 'हे बेबी'ने जिथे खूप हसवलं, तिथे अनेक ठिकाणी भावुकही केलं.

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान अभिनीत २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हे बेबी' चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. 'हे बेबी'ने जिथे खूप हसवलं, तिथे अनेक ठिकाणी भावुकही केलं.

साजिद खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट अमेरिकेतील 'थ्री मॅन अँड ए बेबी' या चित्रपटावर आधारित होता आणि तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

चित्रपटातील तिन्ही मुख्य अभिनेत्यांव्यतिरिक्त, एक गोंडस लहान मुलगी होती, जिने सगळी लाइमलाइट लुटली होती. चित्रपटात क्युट एंजेलची भूमिका जुआना सांघवी या गोड मुलीने साकारली होती.

चित्रपटाच्या १८ वर्षांनंतर, जुआनाची फोटो सोशल मीडियावर पुन्हा समोर आली आहेत, जी पाहून तिचे चाहते खूश झाले आहेत.

गोंडस जुआनाने 'हे बेबी' चित्रपटातून केवळ प्रेक्षकांचेच नव्हे, तर चित्रपटातील कलाकारांचेही मन जिंकले होते. जानेवारी २०२२ मध्ये फरदीन खानने 'हे बेबी'मधील पडद्यामागचा फोटो शेअर केला होता.

त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, लहानग्या जुआनासोबत सीन करण्यासाठी त्याने सिगारेट ओढणे सोडले होते. चित्रपटाच्या रिलीज झाल्यानंतर जुआनाच्या क्यूटनेसवर प्रेक्षकांसोबतच समीक्षकही फिदा झाले होते.

अनेक लोकांचे असे मत आहे की, चित्रपटातील एंजेलने तिन्ही स्टार्सची लाइमलाइट लुटली होती.

नुकतेच जुआनाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो व्हायरल झाले. आता २१ वर्षांची झालेल्या जुआनाला या फोटोंमध्ये ओळखणेही कठीण होत आहे.

जुआनाचे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिला पुन्हा चित्रपटांमध्ये परत आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ती सुपरमॉडेल दिसत असल्याचंही काहींनी म्हटलंय.

आता मोठी झाल्यावर जुआना बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल का, हे पाहणे कमालीचे ठरेल.

















