गरिबांचा देवदूत बनलेल्या सोनू सूदचे घरदेखील आहे त्याच्या मनाप्रमाणेच मोठे, पाहा त्याच्या घराचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 08:00 IST2020-06-03T08:00:00+5:302020-06-03T08:00:02+5:30

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. सोनूच्या मनाइतकेच त्याचे घर देखील मोठे असून तो मुंबईतील अंधेरी या परिसरात राहातो.
सोनूसोबत त्याची पत्नी सोनाली आणि दोन मुलं या अलिशान घरात राहातात.
सोनूने बॉलिवूडमध्ये स्वतःच्या मेहनतीवर आपले एक स्थान निर्माण केले आहे.
सोनूने काहीच वर्षांपूर्वी हे घर घेतले असून या घराचे इंटेरिअर त्याने स्वतः केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.
सोनू आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवणार याची अनेक मजूरांना खात्री असल्याने ते मेसेज करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूकडून मदत मागत आहेत.
सोनू दिवसाला हजारोहून अधिक मजूरांना घरी पाठवत आहे. त्यामुळे सध्या सोनू सूदच्या नावाचीच सगळीकडे चर्चा होत आहे.