अखेर गौरी खान तयार झाली अन् ‘रेड चिलीज’चं रूपडं पालटलं, पाहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 15:50 IST2021-03-28T15:33:17+5:302021-03-28T15:50:44+5:30

गौरीने या ऑफिसचे काही इनसाइड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पती शाहरूख खानने अनेक विनवण्या केल्यानंतर अखेर गौरी खान एकदाची तयार झाली आणि एसआरकेच्या ‘रेड चिलीज’ ऑफिसचं रूपडं बदललं.

होय, गौरीने या ऑफिसचे काही इनसाइड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गौरीने ‘रेड चिलीज’ ऑफिसचा असा काही कायापालट केला की, शाहरूख एकदम खूश्श झाला.

गौरी एक यशस्वी इंटिरिअर डिझाइनर आहे. पतीच्या ‘रेड चिलीज’ ऑफिससाठी तिने मॅस्क्युलिन व मिनिमलिस्टिक थीम निवडली.

ऑफिसच्या टेरेसलाही गौरीने मॉडर्न लूक दिला. त्याचाही एक फोटो गौरीने शेअर केला आहे.

ब्लॅक, व्हाईट व ग्रे ही रंगसंगती शिवाय वुडन वर्कने सजलेल्या या ऑफिसचा नवा लूक पाहून कुणीही थक्क होईल.

या ऑफिसमधील एक एक वस्तू लक्ष वेधून घेणारी आहे. किंग खान ‘कोलकाता नाईट राइडर्स’ या आयपीएल क्रिकेटचा मालक आहे, याची आठवण करून देणाºया अनेक शोभेच्या वस्तू येथे आहेत.

किंगखान शाहरूख खानची पत्नी केवळ हीच गौरी खानची ओळख नाही. इंटीरियर डिझाईन क्षेत्रात गौरी खान हे एक मोठे नाव आहे.

गौरीने अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरांचे इंटीरियरही केले आहे. करण जोहरच्या मुलांची रूम तिनेच सजवली होती.

याशिवाय रणबीर कपूर, वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस. सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही घरांचे इंटिरियर केले होते.