बाबो ! परश्याच्या आर्चीला विसरा, जब्याच्या शालूला बघा, आता दिसतेय फारच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 12:18 IST2021-02-10T12:10:23+5:302021-02-10T12:18:01+5:30
दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'फँड्री' या सिनेमात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार यांच्यासह आणखी एका नवोदित चेह-याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ती होती सोज्वळ अंदाजत रसिकांचे लक्ष वेधून घेणारी शालू म्हणजे राजेश्वरी खरात.

राजेश्वरीने साकारलेली शालूची भूमिका खूप गाजली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तिचा सहज सुंदर अभिनय चाहत्यांना भावला होता.

सिनेमात जब्याची शालू अशी तिची ओळख. पहिलाच सिनेमा असला तरी जब्याप्रमाणे फारशी लोकप्रियताच राजेश्वरीच्या वाट्याला आली नाही.

सिनेमात तिच्या वाट्याला एकही डायलॉग नव्हता.केवळ एक ते दोन संवादच तिला देण्यात आले होते. मात्र तरीही पडद्यावरील अभिनय लाजवाब होता.

'फँड्री'नंतर राजेश्वरीचा आयटमगिरी हा सिनेमा आला होता. मात्र या सिनेमानंतर ती कोणत्याच सिनेमात झळकली नाही.

राजेश्वरी इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून तिचे विविध अंदाजातील फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते.

सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.

तिचा प्रत्येक अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

राजेश्वरीला फोटोशूट करण्याची आवड असून तिने अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस,रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

















