हनुमान ते मेघनाद... ‘रामायण’ मालिकेतील या स्टार्सनी कधीच घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 14:00 IST2020-04-17T14:00:35+5:302020-04-17T14:00:35+5:30
रामायाणातील अनेक कलाकार आज आपल्यात नाहीत.

सुग्रीमची भूमिका साकारणारे श्याम सुंदर यांचे अलीकडे निधन झाले.

रावणाच्या मुलाची अर्थात मेघनादची भूमिका साकरणारे विजय अरोरा यांनी 2007 मध्येच जगाचा निरोप घेतला. कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.

हनुमानाची भूमिका साकारणे अभिनेते दारा सिंग यांनी 12 जुलै 2012 रोजी जगाला अलविदा म्हटले.

रामायणात मंथराची भूमिका साकारणा-या ललिता पवार आज आपल्यात नाहीत.

माता कैकयीची भूमिका साकारणाºया अभिनेत्री जयश्री गडकर यांनीही कधीच जगाला अलविदा म्हटले.

विभीषणची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांचे 2016 रोजी निधन झाले.

राजा जनकची भूमिका साकारणारे मुलराज राजदा यांनीही 2012 मध्ये निधन झाले.

कुंभकर्णाची भूमिका साकारणारे नलिन दवे यांनी वयाच्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

















