'दबंग गर्ल'च्या किलर अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके, पाहा सोनाक्षी सिन्हाचे हटके फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:21 IST2024-04-02T13:07:02+5:302024-04-02T13:21:32+5:30

पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.

लेटेस्ट फोटोमध्ये सोनाक्षीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

ती केशरी रंगाच्या आउटफिटमध्ये फारच सुंदर दिसून आली आहे.

तिचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सोनाक्षीनं प्लाझोसोबत डिझाईनचा कोट कॅरी केला. तर कानात फक्त मॅचिंग झुमके घालत आपला लूक पुर्ण केला.

सोनाक्षीचे फोटो सोशल मीडियावर इतके व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.

लवकरच ती संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

ही वेब सीरिज 1 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सोनाक्षीनं 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खान अभिनीत ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.