एकेकाळी व्हायचं होतं IAS, आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री; ओळखा कोण आहे 'ही' सुंदरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:55 IST2025-02-11T15:44:20+5:302025-02-11T15:55:25+5:30

आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली आणि अनेक सुपर-डुपर हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

या अभिनेत्रीला एकेकाळी IAS अधिकारी व्हायचं होतं पण पुढे काहीतरी वेगळच लिहिलं होतं. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली आणि अनेक सुपर-डुपर हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

आज ही अभिनेत्री इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. यामी गौतम ही पंजाबी चित्रपट दिग्दर्शक मुकेश गौतम यांची मुलगी आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत यामीने खुलासा केला होता की, तिने कधीही अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता.

"मला आयएएस अधिकारी व्हायचं होतं तेव्हा कुटुंबातील काही मित्र चंदीगडला आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी माझ्या पालकांना सांगितलं की मी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा प्रयत्न करावा" असं यामीने सांगितलं.

यामीने यानंतर अभिनय करण्याचा विचार केला. अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. चांद के पार चलो, ये प्यार ना होगा कम यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.

२०१२ मध्ये तिने आयुष्मान खुरानासोबत 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट यामीच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.

खरंतर हा चित्रपट सुपरहिट झाला आणि यामीलाही रातोरात इंडस्ट्रीत ओळख मिळाली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

यामी गौतमने आतापर्यंत अ‍ॅक्शन जॅक्सन, बदलापूर, सनम रे, हृतिक रोशनसोबत काबिल, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, बाला, अ थर्सडे, दसवी, ओएमजी २ असे अनेक उत्तम चित्रपट केले आहेत.

यामी गौतमचं लग्न उरीचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी झालं आहे. त्यांना एक गोड मुलगा देखील आहे, ज्याचं नाव वेदाविद असं आहे.

यामी गौतम सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह असते. ती तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स सतत शेअर करत असते.