यामी गौतमचे फॅन्स असाल तर तिचे हे ग्लॅमरस फोटो नक्कीच पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 17:21 IST2020-03-14T17:05:14+5:302020-03-14T17:21:15+5:30

यामी गौतमने आयुष्यमान खुरानासह 'विक्की डोनर' सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केला होता.
यामीच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
‘काबील’, ‘सनम रे’,‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून यामीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
'काबिल' या चित्रपटातील हृतिक रोशन आणि यामीच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती.
उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातील यामीच्या भूमिकेलाही रसिकांनी पसंती दर्शवली होती.
यामीने खूपच कमी काळात तिची बॉलिवूडमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे.
यामीचे वडील पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शक असून तिची बहीण सुरीली गौतमने पॉवर कट या चित्रपटाद्वारे काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
यामी सध्या तिच्या कामाच्या निमित्ताने मुंबईत राहात असली तरी ती मुळची हिमाचल प्रदेशमधील विलासपूरमधील आहे.
बाला या चित्रपटात यामी नुकतीच झळकली होती.