Virat Anushka : विराट अनुष्काने लेक वामिकासोबत घेतला ट्रेकिंगचा आनंद, कोहली फॅमिलीच्या ऋषिकेश दौऱ्याचे Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 12:03 PM2023-02-01T12:03:50+5:302023-02-01T12:11:30+5:30

विराट अनुष्का लेक वामिकासोबत ऋषिकेशला दौऱ्यावर आहेत.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या धार्मिक दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी ऋषिकेश येथे स्वामी दयानंद गिरी यांचे दर्शन घेतले. स्वामी दयानंद गिरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु आहेत.

स्टार फलंदाज विराट कोहलीला सध्या टी २० मालिकेतून ब्रेक मिळाला आहे. तो ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होईल. त्यापूर्वी विराट आणि अनुष्का लेक वामिकासह धार्मिक दौरा करत आहेत.

दरम्यान विराटने कुटुंबासह ऋषिकेश येथे ट्रेकिंगचा आनंद घेतला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट आणि अनुष्का दोघांनी व्हॅकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

सर्वात आधी अनुष्काने ऋषिकेशच्या डोंगरदऱ्यात ध्यान करतानाचा फोटो पोस्ट केला.हिरवेगार वातावरण, कोवळं ऊन, खळखळ वाहणारा झरा अशा ठिकाणी अनुष्का ध्यान करत बसलेली आहे. या फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडला.

डोंगरभागात लेक वामिकाला घेऊन दोघांनी ट्रेकिंगचाही आनंद लुटला. पाठीवर बॅग घेऊन विराट कोहली चालत आहे तर चिमुकली वामिका त्याच्या पुढे चालताना दिसते.

कधी दोघेही नदी झरे पार करताना दिसतात. ऋषिकेशचं सुंदर वातावरण या फोटोंमधून दिसून येतं.

या सर्व फोटोंमधील एका फोटोने सर्वांचंच लक्ष वेधलं. छोट्या वामिकाला विराटने धरलं आहे आणि वामिका पाण्यात हात बुडवताना दिसते. वामिकाला निळ्या रंगाचं क्युट जॅकेट घालण्यात आलंय. वामिकाचा चेहरा मात्र सर्व फोटोत कुठेही दिसत नाही.

यापूर्वीही विराट अनुष्काने लेकीसह वृंदावनाला भेट दिली होती.तिघांनीही वृंदावनात श्री परमानंदजींचे आशीर्वाद घेतले होते. वृंदावनहून परतल्यानंतर कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत अप्रतिम कामगिरी केली.

सध्या विराट अनुष्काचे हे व्हॅकेशन फोटोज इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांची मुलगी वामिकाची झलकही मध्यंतरी दिसली त्यामुळे चाहत्यांना फार आनंद झाला होता.