Pooja Ramachandran Photos: मेकअपशिवायही खूप सुंदर दिसते साऊथची ही अभिनेत्री, तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रींचे सौंदर्य फिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 00:38 IST2022-03-13T00:33:16+5:302022-03-13T00:38:15+5:30

Pooja Ramachandran Photos: दक्षिणेतील अभिनेत्री पूजा रामचंद्रन ही तिच्या सौंदर्याबरोबरच व्हीजे आणि एक सुंदर मॉडेल आहे. तिच्या सौंदर्यासमोर बॉलीवूड अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाजही फिका पडतो.

दक्षिणेतील अभिनेत्री पूजा रामचंद्रन ही तिच्या सौंदर्याबरोबरच व्हीजे आणि एक सुंदर मॉडेल आहे. तिच्या सौंदर्यासमोर बॉलीवूड अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाजही फिका पडतो.

या अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा पूर्ण दक्षिणेत आहे. तिच्या सुंदर फोटोंकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. तसेच मेकअपशिवाय पूजा ही सुंदर दिसते.

कुरळे केस, गहिरे डोळे आणि गोड स्माईल कुणाचेही लक्ष वेधून घेते.

पूजा रामचंद्रने तिचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ब्युटी पेजेंटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्यानंतर २००४ मध्ये मिस कोईंबतूर २००४ चे विजेतेपद पटकावले होते.

पूजा रामचंद्र मिस कोईंबतूर २००४ चा पुरस्कार मिळवल्यानंतर एक वर्षानंतरच तिने मिस केरळ स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पूजा एसएस म्युझिकमध्ये व्हीजे म्हणून काम करत होती. तसेच तेलुगू रियालिटी टीव्ही शो बिग बॉस तेलुगू २ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

पूजाने २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या Kadhalil Sodhappuvadhu Yeppadi या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर Love Failure मधून तिने तेलुगू चित्रपटात पदार्पण केले.

सध्या ती तामिळ अभिनेता जॉन कोकेनन याच्यासोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. पूजा रामचंद्रन आणि कोकेनन हे दक्षिणेतील फिटनेस फ्रीक कपल्सपैकी एक आहेत.