नाद करा पण किंग खानच्या लेकीचा कुठं! सुहाना खानच्या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 05:24 PM2024-04-21T17:24:11+5:302024-04-21T17:33:15+5:30

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत या इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावत आहे.

'द आर्चीज' सिनेमातून सुहाना खान हिने फिल्मी दुनियेत एन्ट्री घेतली आहे. यातील तिच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झाले होते.

सुहाना सोशल मीडियावर सक्रीय असते. याआधी तिचं प्रायव्हेट अकाऊंट होतं. मात्र आता तिने ते पब्लिक केलं आहे. आपल्या चाहत्यांसाठी सुहाना ही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.

सुहाना खानचे सोशल मीडियावर खूप फॉलोव्हर्स आहेत. नुकतेच सुहाना खान हिने अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुहाना ही मी सध्या इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये ती व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

विशेष म्हणजे या फोटोमध्ये सुहाना खान हिने घातलेला ड्रेस अत्यंत महागडा आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसून आली. तिच्या या ड्रेसनं सर्वांच लक्ष वेधलं. हा ड्रेस खूपच महागडा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहानच्या पोल्का डॉट या ड्रेसची किंमत तीन लाख रुपये आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या महागड्या वस्तूंची चर्चा आहे.

सुहाना खान आपल्या सौंदर्याने सर्वांची मनं सहज जिंकते. सुहानाचे फोटो इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय असतात.

सुहाना हिला कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये स्पॉट केलं जातं. चाहते सध्या तिच्या नव्या सिनेमाची वाट पाहत आहेत.