Photos : सुहाना खानला ख्रिसमसला मिळालं खास गिफ्ट, पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसतेय खूपच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:22 IST2024-12-25T16:07:50+5:302024-12-25T16:22:04+5:30

सुहानाची किलर स्माईल चाहत्यांची मने जिंकत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे.

सुहाना खानने ख्रिसमसनिमित्ताने (Suhana Khan Christmas Celebration) तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. तिनं चाहत्यांना त्याच्या ख्रिसमस गिफ्टची झलक दाखवली आहे.

सुहानाची किलर स्माईल चाहत्यांची मने जिंकत आहे. फोटो शेअर करत तिनं लिहलं, "या ख्रिसमसमध्ये माझी खास डिलिव्हरी".

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुहाना खान लवकरच वडील शाहरुख खानसोबत किंगमध्ये दिसणार आहे.

किंग हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट असणार आहे. रिपोर्टनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

सध्या सुहाना ही महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य नंदा यास डेट करत असल्याची चर्चा आहे.

अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

सुहाना हिनं 'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.