सोनाक्षीपेक्षा वयाने लहान, अभिनेत्रीच्या संपत्तीपेक्षा अर्धीदेखील नाही प्रॉपर्टी; किती श्रीमंत आहे जहीर इक्बाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 01:04 PM2024-06-13T13:04:31+5:302024-06-13T13:08:58+5:30

किती श्रीमंत आहे सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती? जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. सोनाक्षी बॉयफ्रेंड जहीर इकबालशी लग्नगाठ बांधणार आहे. २३ जूनला सोनाक्षी आणि जहीर लग्न करणार आहेत. त्यांचं वेडिंग इन्विटेशनही व्हायरल झालं आहे.

सोनाक्षी जहीरपेक्षा वयाने मोठी आहे. त्यांच्यात २ वर्षांचं अंतर आहे. सोनाक्षी ३७ वर्षांची आहे तर जहीरचं वय ३५ आहे.

सोनाक्षीप्रमाणेच जहीरनेदेखील अभिनयात नशीब आजमावलं होतं. २०१९ मध्ये नोटबुकमधून जहीरने पदार्पण केलं होतं. पण, त्याला यात फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे त्याने बिझनेसची वाट धरली.

जहीर बिझनेसबरोबर मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये देखील काम करतो. यातून वर्षाला तो जवळपास १-२ कोटींची कमाई करतो.

तर सोनाक्षी १०० कोटींची मालकीण आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात सोनाक्षीचा 4BHK फ्लॅट आहे. त्याची किंमत सुमारे १४ कोटींच्या घरात आहे.

याशिवाय सोनाक्षीकडे BMW 6, मर्सिडीज बेंझ, BMW 18 या आलिशान गाड्या आहेत. त्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

तर जहीरकडे मर्सिडीज बेंझ एम क्लास ही गाडी आहे. त्याची किंमत सुमारे ५६.७४ लाख इतकी आहे.

गेल्या ७ वर्षांपासून सोनाक्षी आणि जहीर एकमेकांना डेट करत आहेत. आता ते लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.