वाढतं वय आणि आजारामुळं अखेरच्या दिवसात अशी झाली होती शशी कपूर यांची अवस्था ....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:41 PM2021-03-18T12:41:23+5:302021-03-18T12:57:03+5:30

Remembering Shashi Kapoor, पुढं 'शशी' हेच प्रेमाचं नाव सा-या जगात गाजलं..

सन 1938 मध्ये 18 मार्चला कोलकाता येथे एका अवलियाचा जन्म झाला...पाळण्यातलं नाव कपूर खानदानाला साजेसं असं लांबलचक 'बलबीरराज'.ठेवण्यात आलं...... पुढं 'शशी' हेच प्रेमाचं नाव सा-या जगात गाजलं..

बालकलाकार ते दिग्गज कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेणारा अभिनेता अशी ओळख झालेले शशी कपूर कोट्यवधी रसिक विशेषतः तरुणींच्य गळ्यातले ताईत बनले होते....

आपल्या सगळ्या यशाचं श्रेय त्यांनी आपली जेनिफर कँडल हिला दिलं.. तीच त्यांची खरी प्रेरणास्थान असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं... मात्र जेनिफरच्या निधनानंतर ते एकाकी पडले. हा तो काळ होता ज्यावेळी त्यांचं वजनही थोडं वाढलं होतं..

रिल असो किंवा रियल.... त्याचं चार्मिंग असणं... देखणं दिसणं... यावर रसिका फिदा झाले. असं असलं तरी कधी काळी खांदे उडवत थिरकणारा लाडका अभिनेता व्हीलचेअरवर पाहून सारेच हळहळले...

एका जाहीर कार्यक्रमात बाहेर आल्याचा आनंदही त्यांच्या चेह-यावर दिसला. आजारामुळं शशी कपूर व्हीलचेअरवर खिळून होते.

हीच हतबलता पाहून बहुदा या या चॉकलेट हिरोच्या अश्रूंचा बांधही फुटला होता. ज्यांनी आपली अदाकारी आणि डान्सनं एकेकाळी सा-यांच्या मनावर राज्य केलं... तो समोर येताच सारं वातावरण भावनिक झालं होतं.

यावेळी सारे कपूर कुटुंबीय उपस्थित होते.. प्रत्येकाच्या चेह-यावर शशी कपूर यांच्याबद्दल अभिमान तर दिसतच होता... मात्र त्यांच्या तब्येतीची काळजीही स्पष्ट जाणवत होती.

त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती.. त्याच दरम्यान चित्रपटसृष्टीतल्या योगदानासाठी फिल्मफेअरच्या लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारानं गौरवण्यात आलं...

कधी काळी खांदे उडवत आणि उड्या मारत नाचणारे शशी कपूर यांना व्हीलचेअरवर पाहून अनेकजण हळहळले..

मात्र यश मिळवूनही कायम माणूसकी आणि साधेपणा जपणारा खरा माणूस अशी त्यांची शबाना आझमी यांनी ओळख करुन देताच सा-यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या हरहुन्नरी अभिनेत्याला सलाम केला..

शशी कपूर यांना 2014 मध्ये फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत गेली.

4 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला.