शहनाझ गिल साडीत दिसतेय कमालीची सुंदर; फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 18:38 IST2024-01-15T18:26:47+5:302024-01-15T18:38:37+5:30

बिग बॉसच्या 13व्या सिझनमध्ये शहनाझ सहभागी झाली होती. तेव्हापासून तर ती खूपच प्रसिध्द झाली.

प्रसिद्ध अभिनेत्री शहनाझ गिल तिच्या क्यूटनेस आणि चुलबुल अंदाजासाठी ओळखली जाते.

शहनाझ गिल सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते.

सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतंच शहनाझ गिलने एक फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शहनाझने काळ्या रंगाची साडी नेसली, जिचा पदर सोनेरी आहे. ती या साडीमध्ये सुंदर दिसत आहे.

शहनाझचा बोल्ड लूक तिच्या मेकअपने हायलाइट झाला.

शहनाझचं हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

शहनाझच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून विशेष पसंती मिळताना दिसत आहे.

शहनाझच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती नुकतेच 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात दिसली होती. शहनाझ गिलने स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे आणि त्यावर तिचा ‘देसी वाइब्स विथ शहनाझ गिल’ शो प्रसारित होतो.