शाहरूख खानचा लाडका अबराम शिकतो या शाळेत?, त्याच्या फीचा आकडा पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:24 IST2025-11-19T13:19:13+5:302025-11-19T13:24:46+5:30
Shah Rukh Khan's Son Abram Khan : शाहरुख खानप्रमाणेच त्याची मुलेही नेहमीच चर्चेत असतात. मग ते आर्यन खान असो, सुहाना खान असो वा लहान अबराम खान. अबरामच्या क्युटनेसवर लोक फिदा असतात.

शाहरुख खानप्रमाणेच त्याची मुलेही नेहमीच चर्चेत असतात. मग ते आर्यन खान असो, सुहाना खान असो वा लहान अबराम खान. अबरामच्या क्युटनेसवर लोक फिदा असतात.

शाहरुख खानचा लाडका अबरामचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की अबराम कोणत्या शाळेत शिकतो आणि त्याची फी किती आहे?

अबराम खानचा जन्म २७ मे २०१३ रोजी मुंबईत झाला. आता तो १२ वर्षांचा झाला आहे. लहान वयातच अबराम लोकांचा आवडता खान बनला आहे.

अबराम मुंबईतील सर्वात महागड्या शाळेत शिकतो. या शाळेत सामान्य माणसाला मुलांना शिकवणे शक्य नाही, कारण फी खूप जास्त आहे.

अबराम धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. या शाळेची सुरुवात मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी २००३ मध्ये केली होती.

रिपोर्टनुसार, अबराम ५व्या इयत्तेत शिकतो आहे. शाहरुख खान दर महिन्याला १.७० लाख रुपये फी भरतो. वार्षिक त्याची फी सुमारे २०.४० लाख रुपये इतकी असते.

अबरामचा मोठा भाऊ आर्यन खान आणि बहीण सुहाना खान यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्याच्या शाळेत विद्यार्थ्यांना अनेक सुविधा पुरवल्या जातात. १ लाख ३० हजार चौरस फूट परिसरात पसरलेल्या या शाळेत खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, एसी क्लासरूम, टेरेस गार्डन आणि टेनिस कोर्ट उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे अबरामने चित्रपटांमध्येही पदार्पण केले आहे. खरेतर, तो एक वर्षाचा असताना, त्याला त्याचे वडील शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू ईयर' चित्रपटात पाहिले गेले होते.

















