अमिताभ नाही तर 'या' सुपरस्टारसोबत होतं रेखा यांचं अफेअर, पत्नीने हॉटेलमध्ये पकडलेलं रंगेहाथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:45 IST2025-07-08T13:08:17+5:302025-07-08T13:45:44+5:30
अभिनेत्याच्या पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडलं, 'त्या' रात्री हॉटेलमध्ये काय घडलेलं? जाणून घ्या...

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Rekha) यांचं सौंदर्य आरस्पानी आहे. त्यांचं देखणं रुप आजही बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींना लाजवेल असं आहे.
बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन असलेल्या रेखा यांचं नाव अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
आज वयाच्या ७० व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत. रेखा यांच्या आयुष्यातील अनेक असे किस्से आहेत, जे वादाच्या भोवऱ्यात राहिले.
रेखा आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रेमकथेचे किस्से तर इतकी वर्ष उलटूनही कायम चर्चेत असतात. पण, अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त रेखा यांचे नाव एका दुसऱ्या अभिनेत्यासोबतही जोडलं गेलं होतं. तेव्हा तो अभिनेता विवाहित होता.
रेखा आणि त्या अभिनेत्याच्या प्रेमप्रकरणाच्या अफवा इतक्या पसरल्या होत्या की, असेही म्हटलं जात की सुपरस्टारच्या पत्नीने दोघांना एका हॉटेलमधअये रंगेहाथ पकडलं होतं.
तो अभिनेता होता कमल हासन (Kamal Haasan Once Linked To Rekha). रेखा यांनी 'सिलसिला' चित्रपटासोबतच 'मींदम कोकिला' हा तमिळ चित्रपटही साइन केला होता. या चित्रपटात रेखा यांच्यासोबत कमल हासन आणि श्रीदेवी होत्या. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान कमल हासन आणि रेखा हे एकमेकांच्या खूप जवळ आले.
'मींदम कोकिला' सिनेमाच्या सेटवर कमल हासन आणि रेखा यांच्या प्रेमाची चर्चा पसरली होती. ही चर्चा कमल हासन यांची पत्नी वाणी गणपति यांच्या कानावर गेली.
मीडिया रिपोर्टनुसार, रेखा ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्याठिकाणी वाणी पोहोचल्या. त्यांनी कमल हासन यांच्यासोबत अभिनेत्रीला रंगेहात पकडलं. एवढेच नव्हे तर हॉटेलमधील पाहुण्यांसमोर गोंधळही घातला होता. या संपुर्ण वादानंतर रेखा यांना त्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्यांच्या जागी मल्याळम अभिनेत्री दीपा (उन्नी मेरी) यांना घेण्यात आलं.
दरम्यान, आजपर्यंत कमल हसन आणि रेखा यांनी या घटनेवर कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पुढे वाणी गणपति आणि कमल हासन यांचंही लग्न टिकलं नाही. कमला हासन हे सारिका यांच्या प्रेमात पडले. सारिका लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्यानं कमल यांनी घाईघाईत १९८८ मध्ये वाणी यांना घटस्फोट दिला आणि त्याच वर्षी सारिकाशी लग्न केलं. या लग्नापासून त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. पण, तेही लग्न टिकलं नाही. सारिका आणि कमल हे २००४ मध्ये वेगळे झाले.