PHOTOS : ‘ही’ बनणार अनुष्का शर्माची वहिनी, तृप्तीने ऑफिशिअल केलं कर्णेश शर्मासोबतचं नातं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 14:14 IST2023-01-01T14:05:58+5:302023-01-01T14:14:10+5:30
Tripti Dimri Dating Anushka Sharma Brother Karnesh Sharma : अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा सध्या एका अभिनेत्रीला डेट करतोय आणि दोघांनी खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री कोण तर तृप्ती डिमरी.

अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत लग्न करून सेटल झालीये. आता वेळ आहे ती भावाला सेटल करण्याची. आम्ही बोलतोय ते अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा बद्दल.
कर्णेश शर्मा सध्या एका अभिनेत्रीला डेट करतोय आणि दोघांनी खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री कोण तर तृप्ती डिमरी.
बुलबुल या चित्रपटात झळकलेली तृप्ती डिमरीने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. कर्णेशसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत तिने आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे.
तृप्तीने कर्णेशच्या होम प्रॉडक्शनच्या ‘बुलबुल’ या सिनेमात लीड भूमिका साकारली होती. दोघेही या सिनेमाच्या सेटवर भेटले आणि इथेच दोघांची मैत्री फुलली आणि ही मैत्री प्रेमात बदलली.
अनुष्काने एकप्रकारे कधीच या नात्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. अनुष्काने अलीकडे कर्णेश व तृप्तीचा एका फोटो शेअर करत, मिस यू म्हटलं होतं. तृप्ती अनुष्काला चांगलीच आवडल्याचेही म्हटलं जातंय.
डेहरादूनची तृप्ती 2017 मध्ये श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर बॉयज’मध्ये दिसली होती. यानंतर ती मुंबईत सेटल झालीये.
काही महिन्यांपूर्वी तिचा ‘लैला मजनू’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेता अविनाश तिवारी लीड रोलमध्ये होता.
नुकताच तिचा ‘qala’ हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही कर्णेशच्या प्रॉडक्शन कंपनीने प्रोड्यूस केला होता.
लवकरच तृप्ती रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात रणबीर व रश्मिका मंदाना लीड रोलमध्ये आहेत.