‘नवाब ’सैफ अली खानच्या प्रेमात वेडी आहे परिणीती चोप्रा, लग्न करायलाही होती तयार
By रूपाली मुधोळकर | Updated: October 22, 2020 12:21 IST2020-10-22T12:09:28+5:302020-10-22T12:21:30+5:30
आज परी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण खरे सांगायचे तर बॉलिवूडमध्ये येण्याचा परिणीतीचा कुठलाही इरादा नव्हता.

बॉलिवूडची परी अर्थात परिणीती चोप्रा हिचा आज (22 ऑक्टोबर) वाढदिवस.
प्रियंका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज परी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण खरे सांगायचे तर बॉलिवूडमध्ये येण्याचा परिणीतीचा कुठलाही इरादा नव्हता.
हिरोईन होण्याचा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. चेह-यावर मेकअप थोपणे परिणीतीला जराही आवडायचे नाही आणि त्यामुळेच हिरोईन बनण्याची तिची इच्छा नव्हती. आज याच परीबद्दल आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.
होय, इव्हेस्टमेंट बँकिंगमध्ये करिअर करण्याचे परिणीतीने आधीपासूनच ठरवून टाकले होते. आपल्या याच ध्यासापोटी तिने मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. येथे परीने बिझनेस, फायनान्स व इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्स डिग्री घेतली.
2009 मध्ये परिणीतीला रिसेशनमुळे भारतात परतावे लागले. भारतात आल्यावर परिणीतीला यशराज बॅनमध्ये पब्लिक रिलेशन कन्सलटन्ट म्हणून नोकरी मिळाली. पण ही नोकरीच परिणीतीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
प्रियांका चोप्रा तिच्या ‘सात खून माफ’ या चित्रपटासाठी तयारी करत होती. बहिणीची ही तयारी पाहून परिणीतीच्या मनातही अभिनयाविषयी रूची निर्माण झाली. यानंतर लगेच परिणीतीने अभिनयाचे धडे गिरवले.
बॉलिवूडमध्ये येण्याआधी एक हिरो परिणीतीला प्रचंड आवडायचा. ती त्याची डाय हार्ट फॅन होती. होय, हा अभिनेता कोण तर सैफ अली खान. सैफ तिला इतका आवडायचा की ती चिप्सची पाकिटे गोळा करायची. कारण या पाकिटांवर सैफचा फोटो असायचा.
इतकेच नाही तर सैफसोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. सध्या सैफची बेगम असलेल्या करिनापुढेही परिणीतीने या प्रेमाची कबुली दिली होती.
परिणीतीला पिज्जा प्रचंड आवडतो. अगदी अर्ध्या रात्री झोपेतून उठवून तिला कुणी पिज्जा दिला तर ती नाही म्हणायची नाही. अर्थात आता तिने या आवडीवर बरेच नियंत्रण मिळवले आहे.
परिणीती कमालीची जजमेंटल आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तिला ती पाहताक्षणी जज करते. एकदा एका शोमध्ये आदित्य राय कपूरने सांगितले होते की, परिणीती नखांवरूनही लोकांना जज करू शकते.