मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या विवाहाला एक महिना पू्र्ण, आता पतीसोबत शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 16:10 IST2022-02-27T16:04:28+5:302022-02-27T16:10:06+5:30
Mauni Roy and Suraj Nambiar News: अभिनेत्री मौनी रॉयने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी विवाह केला होता. दोघांच्याही विवाहाला आज एक महिना पूर्ण झाला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी विवाह केला होता. दोघांच्याही विवाहाला आज एक महिना पूर्ण झाला आहे.
त्याचं खास औचित्य साधून मौनी रॉयने सूरज नांबियारसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने लिहिले की, कसं मी तुमच्यावर प्रेम करू, असं की तसं. हो...प्रेमाने. माझ्याकडे अजून काही शब्द नाही आहेत.
शनिवारी सूरज नांबियारच्या घरी मातेची चौकी ठेवण्यात आली होती. तिथे नव्या सुनेसह पूजा करण्यात आली होती.
मौनी आणि सूरज यांनी मिळून अल्टिमेट गुरूज नावाचा प्लॅटफॉर्म आणला आहे. हा एक ग्लोबल एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे.